रीतिचं झुळझुळ पाणी
रीतिचं झुळझुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी
हा जीव वेडा होई थोडा थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगु दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगु दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
मी धुंद झाले मनमोर डोले
पिसाऱ्यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्नफुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी
पिसाऱ्यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्नफुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी
ही तान नाचे आसावरीची
मांडी नव्हे ही कुशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची
किती स्वाद घेऊ ? सरे ना रुचि
साजणा वेळ का मीलनी
मांडी नव्हे ही कुशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची
किती स्वाद घेऊ ? सरे ना रुचि
साजणा वेळ का मीलनी
गीतकार : मुरलीधर गोडे
संगीतकार : ऋषीराज
गायक : उषा मंगेशकर , शैलेंद्रसिंग
चित्रपट : बन्या बापू

No comments:
Post a Comment